Sunday, 19 December 2010
मंगेश पाडगावकर-सलाम
सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणार्याला सलाम, न बघणार्याला सलाम, विकत घेणार्याला सलाम, विकत घेणाचा इषारा करणार्याला सलाम, सलाम,भाई,सबको सलाम. वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम, शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम, देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम, रिकाम्या हातातून ऊद कढणार्या बडेबुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणार्या बापाला सलाम, बापावर गुरगुरणार्या साहेबाला सलाम, साहेबाची टरकवणार्या त्याच्या सहेबाला सलाम, सलाम,प्यारे भाईयों और भैंनो, सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम, भाषणांचे,सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम, वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम, त्यांची वेसण धरणार्या राज्यकर्त्यांना सलाम, ज्याच्या समोर माइक्रोफोन त्याला सलाम, त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम, लाखोंच्या गर्दीला सलाम, गर्दी झुलवणार्या जादुगारांना सलाम, भाईयों और भैनों सबको सलाम. नाक्यावरच्या दादाला सलाम, हातभट्टीवाल्याला सलाम, स्मग्लरला सलाम, मट्केवाल्याला सलाम, त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम, लोकशाहीलाबी सलाम, ठोकरशाहीलाबी सलाम, सत्तेचा ट्रक चालाविण्यार्यांना सलाम, ट्र्क खाली चिरडलेल्या, गांडुळांना,कुत्र्यांना सलाम, ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम, विमानातून बँम्ब फेकणर्यालंना सलाम, शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्यांना सलाम, कळाबाजारवल्यांना सलाम, त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्यांना सलाम, गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्यांना सलाम, तिरडीचे समान विकणार्यांना सलाम, तिरडी उचलणार्या खांद्यांना सलाम, मौत सस्ती करणार्या सर्वांना सलाम, सलाम,प्यारे दोस्तों,सबको सलाम. बिळांना सलाम, बिळातल्या उंदरांना सलाम, घरातल्या झुरळांना सलाम, खाटेतल्या ढेकणांना सलाम, पिचलेल्या बयकोला सलाम, दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम, गाडीत चेंगरणार्या गर्दीला सलाम, किडक्या धान्याला सलाम, भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम, धध्यांच्या मलकाला सलाम, युनीयनच्या लिडरला सलाम, संपाला सलाम, उपासमारीला सलाम, सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम, चाळीचाळीतून तुंबलेल्या संडासातल्या लेंड्यांना सलाम, मानगूट पकडणार्या प्रतेक हाताला सलाम, सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम. या मझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम, या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम, सर्व बिलंदर घोशणांना सलाम, जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम, या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्यांना सलाम, उपनिषदे आणि वेदांना सलाम, साखरकारखान्यांच्या दादांना सलाम, त्यांच्या शेकडो लोर्यांना सलाम, निवडणुकींना सलाम, निवडणुकफंडाला सलाम, अद्रूष्य बुक्यांना सलाम, मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम, ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम, त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम, दलितांवर अत्याचार करणार्यांना सलाम, या बातम्या वचाणार्या सर्व षंढांना सलाम, सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम. सत्ता संपत्तीच्या भाडव्यांचा देश म्हटले तर डोके फोडतील, हलकट लाचारांचा देश म्ह्टले तर रस्त्यावर झोडतील, खरीदलेजाणार्यांचा देश म्हटले तर वाटा रोखतील, देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाइट बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील, शोषण करणार्यांचा देश म्हटले तर नोकरीवरुन कढतील म्हणून आधी मझ्या नपुंसकत्वाला सलाम, आणि त्यानंतर अर्थातच या मझ्या परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम, या महान देशाच्या महान परंपरेला सलाम. सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम, अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिंन माफ करना भाइयों, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला गांडीवर म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम, सलाम,सबको सलाम, भाइयों और भैनों,सबको सलाम.
Sunday, 17 October 2010
Subscribe to:
Comments (Atom)